Sunday, November 17, 2013

ओळखा बघू ते कोण आहेत?


-महावीर सांगलीकर

फेसबुकवर अनेकांनी आपल्याला विशिष्ट विषयाला वाहून घेतले आहे. तसेच त्यांची स्वत:ची अशी खास लेखन शैली असते. त्यामुळे एखादी पोस्ट कुणाची आहे ते पोस्ट पाठवणा-याचे नाव न वाचता ओळखणे सहज शक्य आहे. खालील पोस्ट्स वरून ओळखा बघू त्या कुणाच्या आहेत ते?

1. ते दोघे जुळे भाऊ, दोघात मिळून त्यांची  सात एकर शेती आहे, पण ती त्यांच्या चुलत्याने बळकावली आहे……

2. तरुणांमध्ये मानवी मूल्यांच्या विकासासाठी आम्ही लवकरच एक कार्यशाळा आयोजित करत आहोत…….

3. घटना ही काय कादंबरी आहे की ती एका कुणी लिहावी?.....बामसेफ हे संघ परीवाराचेच आणखी एक पिल्लू  आहे.

4. आर्य बाहेरून आले हा बाहेरून आलेल्यांचा लाडका सिद्धांत आता मोडीत निघाला आहे… आर्य बाहेरचे नव्हते तर आतलेच होते, कारण आज जे स्वत:ला आर्य समजतात त्यांचा रंग आणि अनार्यांचा रंग सारखाच दिसतो.

5. शुभ प्रभात मित्रांनो ……….

6. संत कबीर ने कहा था……. 

7. आज माझी मोलकरीण नेहमीप्रमाणे तिच्या नव-याच्या थोबाडीत मारून कामावर आली.....

8. सुरवातीला वैदिक लोक मुके होते, पण नंतर इतरांचे ऐकूण त्यांनाही बोलावेसे वाटू लागले. त्यांना मोडके-तोडके बोलता येवू लागले, त्यातूनच संस्कृत भाषा तयार झाली. 

9. परप्रांतीय महिलेने दारू पिउन लिहिणा-या पत्रकाराच्या थोबाडीत मारली…….  पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा निषेध असो…….

10. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मी मराठीत केलेला अनुवाद  लवकरच प्रकाशित होत आहे.  विशेष म्हणजे मूळ इंग्रजी पुस्तक अजून प्रकाशित व्हायचे आहे…

11. पानिपतला आणखी एक विशेष घटना घडली जी कुणाला फारशी माहीत नाही ……

12. या देशात अनेक राष्ट्रे आहेत. महाराष्ट्र हे देखील स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला भारताच्या जोखडातून मुक्त केलेच पाहिजे. त्यासाठी लढा देण्याची वेळ आता आली आहे. लढ्याचे नेतृत्व करायला मी तयार आहे, मराठी भिंद्रनवाले होण्यासाठी मी आत्ताच दाढी वाढवून ठेवली आहे.

13. भारताची  फाळणी होण्याआधी या देशाच्या सर्वच प्रांतांमध्ये मराठीतून राज्य कारभार चालत असे. एवढेच नव्हे तर मराठीची उपयुक्तता पाहून इंग्लंडमध्ये देखील मराठीतून राज्यकारभार सुरू झाला होता. 

आपण ज्यांना ओळखले असेल, त्यांचे नाव संबधीत वाक्याच्या नंबर लिहून कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावे. 

2 comments:

Popular Posts