Sunday, February 9, 2014

सूर्य पूर्वेला उगवतो: एक अंधश्रद्धा

 -महावीर सांगलीकर

मी म्हणालो, 'सूर्य पूर्वेला उगवतो'

तो म्हणाला, 'ही तुमची अंधश्रद्धा आहे. सूर्य  उगवतच नाही. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्याने सूर्य उगवत असल्याचा आपल्याला भास होतो.'

त्याचे 'सूर्य  उगवतच नाही. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्याने सूर्य उगवत असल्याचा आपल्याला भास होतो' हे म्हणणे बरोबर आहे. पण 'सूर्य पूर्वेला उगवतो' हे म्हणणे अंधश्रद्धा कसे काय ठरते?

शेवटी आपले परस्पेक्टीव्ह काय आहे यावर आपण आपले म्हणणे मांडत असतो. त्यासाठी व्यावहारिक, सोप्या वाक्यांचा उपयोग करत असतो.

आणि खरेच 'सूर्य पूर्वेला उगवतो' ही अंधश्रद्धा आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी सूर्य उगवल्यावर 'सूर्य उगवल्याचा आपल्याला भास होत आहे' असे म्हणायला शिकायला पाहिजे.
 

No comments:

Post a Comment

Popular Posts